मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

 

ख्‍

        रायगड(जिमाका)दि.26:-मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी हाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष-2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.

 या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते, ही योजना मराठा- कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल.

अर्ज प्रक्रिया आणि मदत- इच्छुक विद्यार्थ्यानी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून2025 आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी Spring 2025 (प्रिल/मे 2025), Fall 2025 (जुलै/ऑगस्ट/सप्टेंबर2025) आणि Spring 2026 (जानेवारी ते मार्च 2026) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.

योजनेचा उद्देश आणि व्याप्ती :-ही योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएच.डी QS World University Ranking मध्ये 200च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये 50जागा पदव्युत्तर पदवी/पदविका आणि 25जागा पीएच.डीच्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीवआहेत.

शिष्यवृत्तीचे स्वरुप :-योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता आणि वैयक्तिक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रतिवर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल 30 लाख रुपये आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

पात्रता निकष :- नागरिकत्व आणि रहिवास लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा.शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय 35 वर्ष आणि पीएच.डीसाठी 40 वर्षेउत्पन्न मर्यादा- कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गांनी प्राप्त एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यापीठ प्रवेश पात्रता  QS World University Ranking 200च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी Unconditional Offer Letter असणे आवश्यक

इतर अटी :-यापूर्वी कोणतीही राज्य ‍ किंवा केद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे-­- विहीत नमुन्यातील अर्ज - सक्षम प्राधिका-याचा उत्पन्नाचा दाखला आणि ITR  (AY 2025-26)Form No 16, - दहावी,बारावी,पदवी,पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका, इतर आवश्यक दाखले, परदेशी विद्यापीठाचे Unconditional Offer Letter विद्यापीठाच्या Prospectus ची प्रत, अद्यावत QS World University Ranking ची माहिती

विशेष सूचना- विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खोटी माहिती  ‍किंवा नावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल.

आधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा ‍किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सारथी कार्यालय संपर्क क्रमांक-020-25592507.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज