महसूल दिन लोकाभिमुख प्रशासन राबविणे ही सर्वांची जबाबदारी --जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी


अलिबाग दि.01, (जिमाका) :-लोकाभिमुख प्रशासन राबवितांना ते लोकांसाठी राबविले जाते, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी राबविले जाते हे लक्षात घेवून सर्व लोकसेवकांनी लोकाभिमुख प्रशासन राबविले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज माणगांव येथे केले.
महसूल दिनानिमित्त माणगांव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे डिजीटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून ऑनलाईन सातबाराचे उद्घाटन वितरण  करण्यात आले.याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, कर्जत प्रांत दत्ता भडकवाड, पनवेल प्रांत भरत शितोले, माणगांव प्रांत बाळासाहेब तिडके, महाड प्रांत विठ्ठल इनामदार, रोह प्रांत रविंद्र बोबले, अलिबाग प्रांत सर्जेराव सोनवणे, श्रीवर्धन प्रांत जयराज सुर्यवंशी तसेच तालुक्यांचे तहसिलदार, नायब तहसिलदार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त्‍ त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण सौजन्याने वागले पाहिजे. त्यांना सहकार्य केले पाहिजे. जिल्हयाचा विकास झपाट्याने होत आहे. नवनवीन प्रकल्प जिल्हयात येत असून जिल्हयाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आपण सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्त्म सेवा दिली पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. सुर्यवंशी यांनी केले.

अधिकारी/कर्मचाऱ्यांचा गुणगौरव
यावेळी जिल्हाधिकारी अन्य मान्यवरांच्या हस्ते महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. त्यात खालील कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश आहे.
अव्वल कारकून :- अनंत मनोहर कांबळे, ए.व्ही.सुसलादे, रुपेश भादीकर, महेश सप्रे, अजिज शेख तर मंडळ अधिकारी :- सोपान बाचकर, श्याम पाटील, पी.एन.नाईक, लिपिक-टंकलेखक :- नितीन पवार, व्ही.एल.सर्णेकर, रुपाली पाटील, गिरीष नार्वेकर, स्वाती चावरेकर, सुनिता डाके, गोविंद सगर तलाठी :- राजेंद्र पाटील, के.एम.पाटील, वैशाली पाटील, विलास मिरगणे, बी.जी.वासांबेकर, सलिमशहा फलंदरशाह शहा, डी.एस.म्हात्रे, सुरेश देवरुखकर, ज्योत्सना शिंदे, सुप्रिया सतविडकर, वाहन चालक :- रुपेश पिंगळे, विलास  पाटील, शिपाई :- सुरेश चव्हाण, आर.डी.शिंदे, प्रतिक पुरव, पी.बी.बैकर, संदेश पाटील, कोतवाल :- ज्ञानेश्वर भोपी, सुभाष वाडीकर, योगेश आखाडे, आर.आर.पवार, नरोत्तम दाभणे याचा  गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार प्रदर्शन तहसिलदार उर्मिला पाटील यांनी केले. यावेळी जिल्हयातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक