देवकुंड धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अलिबाग, दि.2, (जिमाका)- माणगांव तालुक्यातील मौजे भिरा गावचे हद्दीत देवकुंड धबधबा येथे पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची व नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी च यासाठी धरण,तलाव,धबधब्यांचे 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(4)नुसार नमूद बाबींसाठी  दि. 9 ऑक्टोबर पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, माणगाव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेआहेत.
या आदेशान्वये खालील कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नैसर्गिक धबधब्याचे परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे,अनधिकृत  मद्य विक्री करणे,अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडया जागेवर मद्य सेवन करणे. सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. धोकादायक पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धबधब्याच्या वरील बाजुला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे.रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे. वाहनांना धोकादायक   स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा,काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे. महिलांची छेडछाड करणे,टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य् वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, ध्वनीप्रदुषण करणे.धरण,तलाव,धबधब्याचे 1 कि.मी. परिसरात दुचाकी,चार चाकी,सहा चाकी वाहनांचे प्रवेश करणे.(अत्यावश्यक् सेवा वगळून)

सदर आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास  कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा माणगाव उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी  बाळासाहेब तिडके यांनी दिला आहे. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक