जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन




अलिबाग, जि. रायगड, दि.26(जिमाका)- भारतीय संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.  यावेळी उपस्थितांनी संविधानाप्रति एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञाही केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी      डॉ. विजय सूर्यवंशी हे यावेळी उपस्थित होते.  तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी आणि सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक