कापडातील घातक, रंग, रसायन तपासणी सुविधा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24- वस्त्रोद्योगातील घातक रंग, रसायने आदींचे प्रमाण तपासण्यासाठी गॅस डोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोस्कोपी या यंत्राची सुविधा सास्मिरा, मुंबई या संस्थेकडे उपलब्ध करण्यात आली आहे.   रेशिम विकास कार्यक्रम पायाभूत सुविधा निर्मिती व अस्तित्वातील सुविधांचे बळकटीकरण या योजनेंतर्गत सास्मिरा (SAMIRA) मुंबई या संस्थेस Gas Chromatography Mass Spectroscopy (GCMS) ही मशिनरी खरेदी करण्यास शासनाने निधी वितरीत केला आहे.
 Gas Chromatography Mass Spectroscopy (GCMS) या यंत्राद्वारे वस्त्रोद्योगातील रेशीम, सूत,कृत्रिम यार्न, कापड, रंग, रसायने व डाईज इत्यादींचे तपासणी करण्यात येऊन कापडातील घातक रंग व रसायनाचे प्रमाण योग्य, अयोग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.  तपासणी अंती निदर्शनास येणाऱ्या अडचणीवर तांत्रिक उपाययोजना देखील सास्मिरा (SAMIRA) मुंबई यांच्याकडून केली जाईल.  तरी सर्व वस्त्रोद्योग घटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग मुंबई, यांनी कळविले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक