पनवेल येथे मागासवर्गीय मुलींसाठी मोफत वसतीगृह



             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सेक्टर 10, प्लॉट नंबर 21 ग्रीन पार्क सोसायटी समोर पनवेल येथे कार्यरत आहे.    येथे इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग  गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. येथे निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे.
तसेच शैक्षणिक व लेखन साहित्य  विनामुल्य पुरविले जाते.  दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून सहाशे रुपये निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महा विद्यालयीन विदयार्थिनींना दोन संचाकरिता गणवेष भत्ता/रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
               प्रवेशपात्र विद्यार्थिनींच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विदयार्थिनींकरिता अडीच लाख रुपयांच्या आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग  विद्यार्थिनींकरिता एक लाख रुपयांच्या आत असावे.
              ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसीलदार यांचे सहीचा सन 2018-19 मधील उत्पन्नाचा दाखला.  जातीचे मुलकी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक.  आधारकार्ड यांच्या सत्यप्रती.
              सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल यांचेशी कार्यालयीन वेळेत (दूरध्वनी क्र :- 02227422224) संपर्क साधावा, असे  आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पनवेल येथील गृहपाल श्रीमती एम.जे.नरहरे यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक