शामराव पेजे कोकण इमाव आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या मर्यादेत वाढ




             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत  रायगड जिल्ह्यातील इतर मागसवर्ग गरीब, होतकरु व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय,स्वयंरोजगार करण्याकरिता अल्प व्याज दराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंचवीस हजार रुपयांची थेट कर्ज योजनेची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
                लाभार्थी पात्रता : अर्जदार इतर मागासवर्गीय प्रवर्गातील  व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.  वय 18 ते 55 वर्षे असावे.  एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.  सिबील क्रेडिट स्कोर किमान 500 इतका असावा.   महामंडळाच्या (केंद्र व राज्य) कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा.  शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय, निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुण मुले, मुली तसेच अनुभवी व्यक्तींना प्राधान्य.  
कर्जाची परतफेड व व्याजदर : कज कर्जांच्या परतफेडीच्या कालावधी 4 वर्षे राहिल.  मासिक हप्ता रु.2085/- कर्जत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही.  या कर्ज योजनेद्वारे मत्स्य व्यवसाय,मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज,फ्रिज-एस्सी दुरुस्ती, मटण,चिकन शॉप, ऑटो रिपेअरिंग वर्कशॉप, वडापाव, पोळी भाजी, भाजीपाला विक्री,फळ विक्री, किराणा दुकान, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, सायबर कॅफे,संगणक प्रशिक्षण, लॉन्ड्री, टेलरिंग इत्यादी व्यवसाय सुरु करता येतात.
इच्छुक गरजू इतर मागास वर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहिती व कर्ज अर्जाकरिता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक महामंडळ लि.चे जिल्हा कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत, तळमजला गोंधळपाडा अलिबाग (दू.क्र.02141-224488) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक