हातमाग विणकरांची उत्पादने विक्रीसाठी शासनाची हेल्प लाईन व वेब पोर्टल


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16- राज्यातील हातमाग विणकरांनी तयार केलेली वस्त्र उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोफत हेल्पलाईन व वेबपोर्टल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधांचा विणकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योग  विभागाचे प्रादेशिक उपसंचालक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात शेती नंतर रोजगार  रोजगार देणारा व्यवसाय हा वस्त्रोद्योग आहे. राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी राज्य् शासन व केंद्र शासन विविध कल्याणकारी  योजना राबवित आहे. केंद्र शासनाचे हातमाग विणकरांचे हित जोपासण्यासाठी व त्यांना सर्वेातोपरी मदत करण्यासाठी तसेच शासकीय योजनांची सर्वकष माहिती देण्यासाठी बुनकर मित्र  या नावाने क्र.18002089988 अशी हेल्प् लाईन सुरु केली आहे. सदरची सेवा मोफत देण्यात येत आहे. यासाठी विणकराला कोणताही चार्ज त्याचे फोन वरुन आकारला जाणार नाही.
राज्यात हातमाग विणकराने विणलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त् नफा प्रत्यक्ष विणकरास मिळण्यासाठी केंद्र शासनाने www.indianhandmadebazar.com या नावाने स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलद्वारे हातमाग विणकर त्यांचे उत्पादनाचा तपशील,उत्पादनाचा फोटो इत्यादी माहिती अपलोड करुन नवनवीन बाजारपेठ काबिज करु शकतो. हातमाग विणकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्कः प्रादेशिक उपसंचालक,वस्त्रोद्योग मुंबई,7 वा मजला, चरई टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, मावळी मंडळ रोड, ठाणे(पश्चिम) 400601. ई-मेल- rddteztiles3mumbai@rediffmail.com, दूरध्वनी क्र. 022-25405363.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक