सैनिक स्कूल सातारा-प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांनी संपर्क साधावा



            अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका)-  सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता 6 वी व 9 वी साठी वर्ष 2018-19 सत्राच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (मुलींना या शाळेत प्रवेश दिला जात नाही.) प्रवेश परीक्षा ओ.एम.आर. पध्दतीने घेतली जाईल, ज्यात उत्तरे बहुपर्यायी असतील.
            वयोमर्यादा व निवड पध्दती इयत्ता 6 वी उमेदवाराची जन्मतारीख हि दिनांक 02 जुलै, 2007 ते 1 जुलै, 2008 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी. इयत्ता 9 वी उमेदवाराची जन्मतारीख हि दिनांक 02 जुलै 2004 ते 1 जुलै, 2005 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी व उमदेवार हा प्रवेशावेळी मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेला असावा. निवड पध्दती-लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी, इयत्ता 6 वीची रिक्त पदे 71 व इयत्ता 9 वीची रिक्त पदे 05. रिक्त पदांच्या संख्येत वाढ/कमी होऊ शकते.
            राखीव जागा-अनुसूचित जाती 15 % , अनुसूचित जमाती 7.5 %, आजी व माजी सैनिकांची मुले 25 % (अ.जा. व अ.ज. यांच्या राखीव जागा सोडून).
            प्रवेश परीक्षा केंद्र –इयत्ता 6 वी- अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पुणे, सातारा. इयत्ता 9 वी- फक्त सातारा.प्रवेश परीक्षा दिनांक 07 जानेवारी 2018 (रविवार), माहितीपत्रक-शाळेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
            प्रवेश परीक्षा अर्जाची उपलब्धता-प्रवेश परीक्षा अर्ज दिनांक 16 ऑक्टोंबर,  ते 30 नोव्हेंबर, 2017 पर्यंत शाळेच्या वेबसाईटवर आणि सैनिक स्कूल सातारा येथे कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 पर्यंत उपलब्ध असतील.
            प्रवेश परीक्षा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख-दिनांक 5 डिसेंबर 2017 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा स्तव: शाळेच्या ऑफिसमध्ये जमा करु शकता. कुरियर अथवा पोस्टाने, उशिरा येणारे अर्ज रद्द केले जातील व त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही.
प्रवेश परीक्षा अर्ज दरपत्रक
उमेदवाराची श्रेणी
ऑनलाईन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम फक्त डिमांड ड्राफ्टेनेच स्विकारली जाईल)
ऑफलाईन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम फक्त डिमांड ड्राफ्टेने किंवा रोखीने स्विकारली जाईल)
सामान्य प्रवर्गातील मुले (जनरल),
संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांची मुले, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्गातील मुले
रु.400/-
रु.400/-
फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील मुले
रु.250/-
रु.250/-
डिमांड ड्राफ्ट हा प्रिन्सीपल, सैनिक स्कूल सातारा यांचे नावाने काढलेला असावा. (मनी ऑर्डर/पोस्टल ऑर्डर, चेक/ चुकीचे डिमांड ड्राफ्ट स्विकारले जाणार नाहीत).
टिप – अधिक माहितीसाठी शाळेच्या 02162-238122 ह्या टेलिफोन नंबरवर वेळोवळी संपर्क साधावा किंवा शाळेच्या www.sainiksatara.org या वेबसाईटला भेट द्यावी. असे प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  


000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक