जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा


अलिबाग,(जिमाका)दि.17:- भगवान धन्वंतरी हे आरोग्य शास्त्राचे आरोग्य दैवत मानले जाते. संपूर्ण देशात आरोग्य् क्षेत्रात आरोग्य संवर्धनासाठी धन्वंतरी जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे निमित्त साधून दिनांक 18 ऑक्टोबर 2017 ते 30 ऑक्टोबर 2017 या कालावधीत आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन अभियान आयोजित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग येथे आयुष कार्यक्रमांतर्गत दि.17 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांस डॉ.अजित गवळी,जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अनिल फुटाणे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.सुहास कोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क)  डॉ.सुचिता गवळी,वैद्यकीय अधिक्षक,उप जिल्हा रुग्णालय पेण,डॉ.मृणालिनी कदम,अस्थिरोगतज्ञ, डॉ.चेतना पाटील,जिल्हा आयुष अधिकारी उपस्थित होते. आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन या जनजागृती अभियानाचा या प्रसंगी शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात श्री धन्वंतरी स्तवन करुन आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन या विषयावर डॉ.अर्चिस पाटील,वैद्यकीय अधिकारी एम.डी.(आयुर्वेद)यांनी मार्गदर्शन केले.आयुर्वेदाद्वारे वेदना रहित जीवन जनजागृती  करण्यासाठी विविध कार्यक्रम जिल्ह्याभरात  राबविण्यात येणार असून  या कार्यक्रमास लोकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात यावा.  असे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास आयुष कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली पाटील(आयुर्वेद),डॉ.रश्मी गंभीर(हो‍मिओपॅथी),श्री. सीमा रेजा,योगा प्रशिक्षिका व मसाज थेरपिस्ट श्री.रुपेश पाटील व श्रीम.दिपाली म्हात्रे व जिल्हा रुग्णालय येथील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुष विभागातर्फे अभ्यंगस्नान तेल व सुगंधी उटणे वाटप करणेत आले.असे जिल्हा शल्य चिकित्सक ,जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक