हयातीचे दाखले जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना 20 नोव्हेंबर पर्यंत मुदत


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16-जिल्हा कोषागार कार्यालय रायगड अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची यादी संबंधित बँकेत यादी पाठविण्यात आलेली आहे. तरी दिनांक 1 नोव्हेंबर 2017  रोजी  किंवा त्यानंतर बँकेत जावून त्या यादीवरील नावासमोर हयात असल्याबाबतच्या  दिनांकासह स्वाक्षरी करावी व आधारकार्ड,पॅनकार्ड व मोबाईल क्रमांकासह नमूद करावे. मनिऑर्डरने निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सांक्षांकनासह आधारकार्ड, पॅनकार्ड व मोबाईल क्रमांक नमूद करुन हयातीचा दाखला दिनांक 20 नोव्हेंबर 2017 अखेरपर्यंत सादर करावेत. त्याचप्रमाणे सन 2017-18  मधील ज्या निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतनावरील रक्कम आयकर करप्राप्त आहे,अशा निवृत्तीवेतनधारकांनी आपले आयकराबाबत आपली बचतीची कागदपत्र व पॅनकार्ड या कार्यालयाकडे दि.10 नोव्हेंबर 2017 पर्यंत त्वरीत सादर करावीत असे आवाहन, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला,  यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक