छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजना : कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा करणार; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.17- छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला हप्ता बुधवार दि.18 रोजी दुपारी बारा वाजता एका समारंभपुर्वक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात दुपारी बारा वाजता या कार्यक्रमास पालकमंत्री ना. प्रकाश महेता, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची उपस्थिती असेल असे जिल्हा उपनिबंधक  पी.एम.खोडका यांनी सांगितले.
 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रारंभ चा राज्यस्तरीय कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे उद्या म्हणजे बुधवार दि. 18 रोजी  दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्रीमहोदयांची उपस्थिती असणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होतील. व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपस्थितांना राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक