अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार स्वच्छता स्वच्छतेसाठी जर्मन बनावटीच्या 3 अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध

 

 

रायगड (जिमाका)दि.31 :- अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला असून, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पाम टेक कंपनीच्या 3 अत्याधुनिक बीच क्लिनींग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिन्स ट्रक्टरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून, किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे. या बीच क्लिनींग मशिनचे संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आले.

पोलीस विभागाच्या मैदानावर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे नेहमी दिसून येते. शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संबंधित स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवून किनारे स्वच्छ करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी स्वच्छतेसाठी पाम टेक कंपनीची जर्मन बनावटीच्या 3 मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. बुधवारी या मशिनचे हस्तांतरण

पहिले मशिन : आक्षी, नागांव, रेवदंडा.दुसरे मशिन: वरसोली, थळ, नैवेद्य नवगाव, तिसरे मशिन: किहिम, आवास, सासवणे या  ग्रामपंचायतींना करण्यात आले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड