08 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन
रायगड (जिमाका) दि.02:- विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि. 08 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीमध्ये प्रलंबित प्रकारणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असून या दिवशी व वेळी आपण आपल्याकडील आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील जिल्ह्यातील विविध राज्य शासकीय कार्यालयातील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी हे मोठया प्रमाणात सन 2023 ते 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती प्रकरणे कार्यालयीन स्तरावर तसेच वेतन पडताळणी पथकाकडे व रजा मंजूरीवर प्रलंबित आहेत.
000000
Comments
Post a Comment