भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदला मध्ये अधिकारी  पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB)  या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार दिनांक 18/09/2019 ते शुक्रवार दि.27/09/2019 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 50 आयोजन  करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची  व्यवस्था नि:शुल्क आहे.
 रायगड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड-अलिबाग येथे दिनांक शुक्रवार 09 सप्टेंबर 2019 सकाळी 11 वाजता  मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्या पुर्वी   PCTC  Training च्या Google Plus  पेज वरती  किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट  www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध Check List  यांचे अवलोकन करुन त्याची दोन  प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊन लोड करून त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून (किंवा प्रिंट कार्यालयाकडून घ्यावी) ते पुर्ण भरून कार्यालयास सादर करावेत.
            केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली  नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र  कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत.
अ)     कंबाईनड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झमिनेशन  (CDSE-UPSC)  अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झमिनेशन (NDA UPSC)  पास झालेली असावी  व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.  
ब)     एन सी सी ‘C’ सर्टीफिकेट किंवा ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एन. सी. सी.  ग्रुप हेडक्वार्टरने एस. एस. बी साठी  शिफारस केलेली असावी.  
        क)     टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
        ड)     Univirsity Entry Scheme साठी एस. एस.  बी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
                        आधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रमांक 0253-2451031 आणि 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, डॉ. पद्मश्री एस बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक