ईव्हिएम व व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती जिल्ह्यातील मतदारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.29:- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (VVPAT: Voter Verified Paper Audit Trail) मशीन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून  या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून  जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनजागृती कार्यक्रमासाठी रवाना पथकाचे श्रीफळ वाढवून तसेच हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.  तसेच प्रत्यक्ष मतदारांना मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर त्यासोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय हा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्र, गर्दीची ठिकाणे, बाजार आदी ठिकाणी हे जनजागृती पथक नागरिकांना ईव्हिएम,व्हीव्हीपॅट याबाबत माहिती देईल.   यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीम.वैशाली माने,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती यांचीही उपस्थिती होती.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक