शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा

 


 

रायगड(जिमाका)दि.24:- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील सात खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज घोषणा केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्रीमती पुनिता गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत वाघ आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की,  धैर्य, शौर्य, संयम, प्रयत्न हे या रायगडच्या मातीचे गुण आहेत. या जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी सात खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे आणि राज्याचे नव्हे तर देशाचा नाव लौकिक वाढविला पाहिजे. त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. तसेच वेळोवेळी धोरणत्मक निर्णय घेते. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन चांगली कामगिरी करावी अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी श्रीमती सुमा सिध्दार्थ शिरुर, पनवेल (पॅरा शुटींग) यांना जिजामाता पुरस्कार थेट पुरस्कार, श्रेयस वैद्य, नागोठणे (जलतरण वॉटरपोलो), मानसी मोहिते, महाड (ट्रायथलॉन), धनंजय पांडे, महाड (रोईंग), ऋषिकेश मालोरे, माणगाव (वुशू) (दिव्यांग), कोमल किरवे (जलतरणवॉटरपोलो), स्वस्तिक घोष यांना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत वाघ यांनी केले. आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांनी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज