इ.10 व 12वीच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभागी खेळाडूंना क्रीडा गुण सवलत:15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.:-9 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन दि. २१ एप्रिल, २०१५ नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परिक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्यासंदर्भातील सुधारीत कार्यपद्धतीस शासन मान्यता देण्यात आली आहे.
            शासन निर्णयातील परिशिष्ट नुसार भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळ, भारतीय ऑलिंपिक व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची संलग्नता असलेले एकविध खेळाच्या राज्य संघटना आयोजित खेळ क्रीडा गुणांसाठी ग्राह्य असणार आहेत. एकविध खेळाच्या  राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणा-या स्पर्धांचे अहवाल शासन निर्णयातील परिशिष्ट मधील कागदपत्रांच्या यादीनुसार परिपुर्ण असतील तरच खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरीता शिफारस करण्यात येईल. एकविध खेळाच्या संघटनेमार्फत आयोजित स्पर्धांचे आयोजन जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर या क्रमाने झाले असेल तरच क्रीडा गुण सवलत देण्यात येणार आहे. क्रीडा गुण सवलतीसाठी स्पर्धांचा १ जुन ते २८२९ फेब्रुवारी हा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदरील क्रीडा गुण सवलत नियमित विद्यार्थ्यांसाठीच लागू असणार आहे.
            रायगड जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांनी शासन निर्णयातील परिशिष्ट व परिशिष्ट नुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता दि. १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी पर्यंत या कार्यालयात सादर करावा उशिरा व अपुर्ण अहवालामुळे विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित संघटनेची असेल याची नोंद घेण्यात यावी.
            जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील मुख्याध्यापक / प्राचार्या यांनी आपल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील पात्र खेळाडू विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव स्पर्धा प्रमाणपत्र व हॉल तिकीटाच्या झेरॉक्स प्रतीसह aaplesarkar.mahaonline.gov.in वर ऑनलाईन व मुळप्रत या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन श्री. महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांनी केले आहे. 

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक