'आत्मा'अंतर्गत महिलांना फळ प्रक्रीया प्रशिक्षण


अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.5- आत्मा अंतर्गत मौजे लोणीवली ता. पनवेल येथे कृषि विभागामार्फत महिलांसाठी फळप्रक्रीया प्रशिक्षण संपन्न झाले. या कार्यक्रमास औरंगाबाद येथील फळ प्रक्रीया प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक श्रीमती अलका जोशी व श्रीमती स्मिता साळुंखे तसेच लोणीवली परीसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना केचप, जॅम, जेली व विविध प्रकारच्या चटण्या व लोणची इ. बाबत प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फळ प्रक्रिया करताना ते अधिक टिकाऊ होणेबाबत उपयुक्त टिप्स देण्यात आल्या. सहभागी महिलांना फळ प्रक्रिया व्यवसायास उपयुक्त प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
            या कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी पी. डी. सिगेदार उपस्थित होते. त्यांनी महिलांना सदर प्रशिक्षणातुन प्रेरणा घेऊन बचत गटाच्या माध्यमातुन छोटे प्रक्रिया उद्योग सुरु करुन आर्थिक उन्नती करावी, तसेच नजीकच्या काळात होणा-या धान्य महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
           सदर कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी पनवेल आर. डी. बनकर, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती एस. एन. जाधव उपस्थित होते. तसेच कृषि पर्यवेक्षक घरत व कृषि सहाय्यक श्रीमती ठाकुर, श्रीमती अलका बुरकुल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक