मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सन 2018-19 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक


अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.5-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील नियमान्वये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना सर्व खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित पात्र शाळांमध्ये  किमान 25 टक्के  प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. 25टक्के प्रवेशाकरिता पात्र असणाऱ्या सर्व पात्र्‍ शाळांनी 25 टक्के प्रवेशाबाबतच्या माहितीचा फलक शाळेच्या दर्शनी भागात नागरिकांना सहज दिसेल अशा सूचना प्रवेशपात्र शाळांना दिल्या आहेत. त्यानुसारऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सन 2018-19 चे वेळापत्रक खालीलप्रमाणे-
पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे- 12 फेब्रुवारी 2018 पर्यंत.पहिली सोडत काढणे -14 ते 15 फेब्रुवारी ,लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहीत मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करणे.16 फेब्रुवारी ते 1मार्च पर्यंत. ज्या पालकांना प्रथम लॉटरीवेळी अर्ज करता आला नाही त्यांच्याकरीता अर्ज करण्याचा कालावधी-16 फेब्रुवारी  ते 3 मार्च पर्यंत.पहिल्या लॉटरीनंतर प्रवेशाची मुदत संपल्यावर कार्यशाळा घेऊन प्रवेश पात्र शाळांमधील रिक्त् पदांची संख्या संख्या निश्चित करणे (बीईओ स्तरावरुन)-3मार्च  ते 6मार्च पर्यंत.दुसरी सोडत- 7 मार्च ते 8 मार्च पर्यंत.लॉटरीच्या प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे.9 ते 21 मार्च 2018 पर्यंत.ज्या पालकांना उपरोक्त लॉटरीच्या वेळी अर्ज करता आला नाही. त्यांच्याकरिता अर्ज करण्याचा कालावधी. 9 मार्च  ते 22 मार्च  पर्यंत. दुसऱ्या लॉटरीनंतर प्रवेशाची मुदत संपल्यावर कार्यशाळा घेऊन प्रवेश पात्र शाळांमधील रिक्त्‍ पदांची संख्या ऑलनाईन दर्शविणे.तिसरी सोडत काढणे- 26 मार्च ते 27 मार्च पर्यंत. तिसऱ्या लॉटरीनंतर प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे. 28 मार्च ते 7 एप्रिल पर्यंत. तिसऱ्या लॉटरीनंतर प्रवेशाची मुदत संपल्यावर कार्यशाळा घेऊन प्रवेश पात्र शाळांमधील रिक्त्‍ पदांची संख्या ऑनलाईन दर्शविणे. प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे. 1 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत.
तरी आरटीई अंतर्गत प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना प्रवेशाबाबतची कार्यवाही करण्याची इच्छुक पालक,मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच पालकांना ऑनलाईन अर्ज भरतांना संगणकीय प्रणालीमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक