जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी मार्च 2022 अखेर 100 टक्के खर्च करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी


अलिबाग, दि.31 (जिमाका):- जिल्हा वार्षिक नियोजनचा निधी विहित कालावधीत (मार्च 2022 अखेर) खर्च करण्यात राज्यात रायगड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 करिता शासनाकडून जिल्हा वार्षिक नियोजनचा मंजूर व प्राप्त निधी रु.275 कोटी इतका होता. हा संपूर्ण निधी पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विकास व प्रशासकीय कामांसाठी शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला होता. यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.मेहेत्रे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.देसाई आणि त्यांच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

आज दि.31 मार्च 2022 अखेर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्याने रु.275 कोटी हा संपूर्ण निधी 100% खर्च करण्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे सर्वांच्या योग्य नियोजनाचे यश आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक