दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज करावेत

अलिबाग, दि.01 (जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील, त्यांनी दि.05 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 06 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.06 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा, अतिरिक्त डीडी कमीत कमी 301 रु.चा असावा. त्यापेक्षा कमी रकमेच्या डीडी चा विचार केला जाणार नाही. या अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 4.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

ज्या दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील, त्यांनी दि.06 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात जमा करावेत. यामध्ये एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.07 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.07 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा अतिरीक्त डीडी कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या डीडी चा विचार केला जाणार नाही. या अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 04.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

हे डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण (DY. RTO PEN) यांच्या नावे राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेचा पेण येथील असावा तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी (फक्त एकच डीडी) या सीलबंद पाकीटात जमा करावा. विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे असलेले डीडी बाद केले जातील.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

नवीन दुचाकी मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:- तिप्पट शुल्क (चारचाकी) चे अर्ज स्विकारणे, दि.05 एप्रिल 2022, तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जांसाठी लिलाव, दि.06 एप्रिल 2022, दुचाकी वाहनांसाठी अर्ज स्विकारणे, दि.06 एप्रिल 2022, दुचाकी वाहनांसाठी आलेल्या अर्जांचा लिलाव, दि.07 एप्रिल 2022 रोजी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक