जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा केंद्र अभ्यासिकेचे म्हसळा सार्वजनिक वाचनालय येथे उद्घाटन संपन्न


 

अलिबाग, दि.30 (जिमाका):- म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालय येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्राच्या अभ्यासिकेचे उद्घाटन आज करण्यात आले.

या कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमात म्हसळा तहसिलदार श्री.समीर घारे, महसूल नायब तहसिलदार श्री.डी.जे.पाटील, प्राचार्य श्री.मोरे, ग्रंथपाल श्री.मशाळे, सरपंच श्री.पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा बोरसे, विद्यार्थिनी कु.प्राची माळी, श्री.सुनिल उमरठकर यांनी गरुडझेप स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले व म्हसळा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्राचा व अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री.समीर घारे यांनी केले.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड