रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी रु.27 कोटी 18 लाख 6 हजार निधीस प्रशासकीय तर रु.15 कोटी 70 लाख रक्कमेचे निधी वितरणास शासनाची मान्यता प्रदान

 

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत कोकण विभागातील कामांसाठी रु.188 कोटी 99 लाख 65 हजार निधीस प्रशासकीय तर रु.65 कोटी 55 लक्ष 39 हजार निधी वितरणास शासनाची मान्यता प्रदान

  

पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

 

अलिबाग, दि.31 (जिमाका):- कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास ही योजना घोषित केली.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याला भरभरून निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, येथील स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी व त्याकरिता लागणारा निधी शासनाकडून मिळविण्याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या या प्रयत्नांतूनच शासनाकडून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल 27 कोटी 18 लाख 6 हजार रुपयांच्या विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळवून त्यापैकी 15 कोटी 70 लाख रक्कमेचे वितरीत करण्याचे आदेशही मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

त्याची माहिती पुढीलप्रमाणे:-

·         श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे, बसविणे व कार्यान्वित करणे - (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 93 लाख 85 हजार, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 51 लाख),

·         बोर्ली पंचतन येथील गणेश मंदिर सभागृहाचे बांधकाम करणे (प्रशासकीय मान्यता - रु.66 लाख 32 हजार, वितरीत रक्कम – रु.50 लाख),

·         बोर्ली पंचतन येथील तलावाचे बांधकाम व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.60 लाख),

·         रोहा नगरपरिषद हद्दीतील श्री हनुमान टेकडी परिसर सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.3 कोटी 45 लाख, वितरीत रक्कम – रु.2 कोटी 50 लाख),

·         कुंडलिका नदीमध्ये साजे ते कामथ भागामध्ये चालणाऱ्या राफ्टिंगगसाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 20 लाख, वितरीत रक्कम – रु.80 लाख),

·         कोलाड येथील विभागीय वसाहत मधील नाना-नानी पार्क सुशोभीकरण दुरुस्ती करणे (प्रशासकीय मान्यता - रु.4 कोटी, वितरीत रक्कम – रु.2 कोटी),

·         अलिबाग येथील दर्यासारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 53 लाख, वितरीत रक्कम – रु.75 लाख),  

·         पेण तालुक्यातील मौजे गागोदे बुद्रुक येथील आचार्य विनोबा भावे यांचे स्मारक परिसर सुधारणा करणे, मौजे गागोदे बुद्रुक येथे स्वागत कमान बांधणे, मौजे गागोदे बुद्रुक येथे हायवेपासून तलावापर्यंत रस्ता तयार करणे, मौजे गागोदे बुद्रुक येथे वाचनालय इमारत बांधणे, मौजे गागोदे बुद्रुक येथे रोड लगत स्ट्रिट लाईट बसविणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी 82 लाख 93 हजार, वितरीत रक्कम – रु. 1 कोटी),

·         कर्जत तालुक्यातील पोशिर येथील पुरातन तलावाचा गाळ काढणे, पुरातन तलावाचा आतील बाजूस संरक्षक भिंत बांधणे (प्रशासकीय मान्यता - रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.75 लाख),

·         मौजे भिवपुरी येथील अहिल्यादेवी तलाव परिसर विकास कामे (प्रशासकीय मान्यता - रु.60 लाख, वितरीत रक्कम – रु.20 लाख),

·         रोहा तालुक्यातील तळाघर येथील तलावाचे संवर्धन करणे (प्रशासकीय मान्यता - रु.24 लाख 99 हजार, वितरीत रक्कम – रु.24 लाख 99 हजार),

·         तिसे येथील तलावाचे संवर्धन करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.70 लाख),

·         पाली नगपंचायत हद्दीतील वरचा देऊळवाडा व खालचा देऊळवाडा समोरील झापोळे तळ्यासभोवती सुशोभिकरणे व उद्यान तयार करणे (प्रशासकीय मान्यता - रु.42 लाख, वितरीत रक्कम – रु.25 लाख),

·         हटाळेश्वर मंदिर तलावाला संरक्षण भिंत व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता - रु.55 लाख, वितरीत रक्कम – रु.40 लाख),

·         मुरुड तालुक्यातील मुरूड-जंजिरा बुद्रुक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे, बसविणे व कार्यान्वित करणे (प्रशासकीय मान्यता - रु.74 लाख 97 हजार, वितरीत रक्कम – रु.50 लाख),

·         महाड तालुक्यातील मौजे रामदास पठार येथे तलावाचे बांधकाम व सुशोभिकरण करणे, (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.50 लाख),

·         मौजे रामदास पठार येथे तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करणे (प्रशासकीय मान्यता - रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.50 लाख),

·         माणगाव तालुक्यातील मौजे गोरेगाव येथे राम तलावाचे सुशोभिकरण, बांधकाम व वरदेश्वर मंदिराजवळ सभामंडप करणे (प्रशासकीय मान्यता - रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी),

·         मौजे निजामपूर येथे शिवकालीन तलावाचे सुशोभिकरण व बांधकाम करणे (प्रशासकीय मान्यता - रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी),

अशा प्रकारे एकूण 27 कोटी 18 लाख 6 हजार रुपयांच्या विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि त्यापैकी 15 कोटी 70 लाख रक्कमेचे वितरीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

अशा प्रकारे जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील विकास साधण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे या सतत कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध विषयांबाबतच्या विकासकामांसाठी निधी मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाकडून नेहमीच सहकार्य मिळत आले आहे, याकरिता पालकमंत्री कु.तटकरे यांनी राज्य शासनाचे विशेष आभार मानले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक