जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नियुक्तीबाबत घेतला आढावा

अलिबाग,दि.29 (जिमाका):- जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी दि.26 मार्च 2022 रोजी तालुका सहाय्यक निबंधक व तालुका लेखापरीक्षक यांची माहे फेब्रुवारी 2022 अखेरचे सन 2020-21 या कालावधीचे जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करणे आणि सन 2021-22 या कालावधीचे लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची ठरावाने नियुक्ती या विषयाबाबत आढावा घेतला.

या सभेमध्ये तालुकानिहाय माहिती नुसार एकूण लेखापरीक्षण करावयाच्या ठरावाने 2 हजार 235 व परंतुकान्वये 3 हजार 397 अशा एकूण 5 हजार 632 संस्थांपैकी माहे फेब्रुवारी 2022 अखेर ठरावान्वये 1 हजार 919 संस्था व परंतुकान्वये 873 संस्था अशा एकूण 2 हजार 792 संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झालेले असून उर्वरीत शिल्लक पैकी ठरावान्वये 316 व परंतुकान्वये 2 हजार 524 अशा एकूण 2 हजार 840 संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले.

तसेच सन 2021-2022 या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षणासाठी दि.31 मार्च 2021 अखेरच्या अपेंडिक्सप्रमाणे लेखापरीक्षणास पात्र असलेल्या एकूण 5 हजार 946 संस्थापैकी फक्त 762 संस्थांनीच लेखापरीक्षकांची ठरावाने नियुक्ती केली असून उर्वरीत एकूण 5 हजार 184 संस्थांनी लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे बाकी असल्याचे निदर्शनास आले.

जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी दि.31 मार्च 2022 अखेर सन 2020-21 वैधानिक लेखापरीक्षण 100 टक्के पूर्ण करून घ्यावे. सन 2021-22 या कालावधीचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकांच्या ठरावाने नियुक्त्या करण्याची मुदत दि.31 मार्च 2022 पर्यंत असल्याने संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा संचालक मंडळ सभेमध्ये निबंधकाच्या नामतालिकेवरील पात्र लेखापरीक्षकाची नियुक्ती करून याबाबतचा ठराव व लेखापरीक्षकाचे संमतीपत्र दि.04 एप्रिल 2022 पर्यंत तालुका सहाय्यक निबंधक व तालुका लेखापरीक्षक कार्यालयाकडे दाखल करावेत, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75(2 अ) व कलम 81 अन्वये सहकारी संस्थान दरवर्षी वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करवून घेणे अनिवार्य आहे. यात कसूर झाल्यास संबंधित संस्थेविरूध्द अपात्रतेची दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.

तरी ज्याचे सन 2020-21 या कालावधीचे लेखापरीक्षण पूर्ण झाले नाही, अशा संस्था अवसायनात घेणे तसेच सन 2021-22 या कालावधीचे लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थांनी ठरावान्वये लेखापरीक्षकाची नियुक्ती न केलेल्या संस्थांची परंतुकान्वये लेखापरीक्षक नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सर्व सहकारी संस्थांना जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक