विधानसभा निवडणूक 2019 प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी,कर्मचाऱ्यांवार होणार कारवाई



रायगड अलिबाग दि.30, विधानसभा निवडणूकीच्या प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार व निवडणूक संचालनासंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.सुर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 घोषित झाली असून रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 2714 मतदान केंद्रावर दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण 13600 कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी या प्रमाणे जबाबदारी देण्यात आलेली आहे व त्याप्रमाणे सर्व कर्मचारी यांना आदेश बजाविण्यात आले आहेत.  या सर्व मतदान कर्मचारी यांचे निवडणूक कामकाज विषयक प्रथम प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ निहाय दिनांक 28 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आले होते.  या प्रशिक्षणासाठी सर्व नियुक्त मतदान कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु एकूण 1277 मतदान कर्मचारी प्रथम प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.  तर या 1277 कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून  1 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.  उपस्थित न होणाऱ्या नियुक्त कर्मचारी यांचे विरुध्द मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार व निवडणूक संचालनासंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक