तरुणांनी मतदान जागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे--स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव




रायगड-अलिबाग दि.01:- तरुणांनी मतदान जागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे.  मतदान जागृती हे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याचे आवाहन स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अभियांत्रिकी महाविद्यालय लोणेरे, ता. माणगांव येथे मतदान जागृती कार्यक्रम व ई.व्ही.एम. व व्हीव्हीपॅट हातळणीबाबत आयोजित कार्यक्रमा श्री.जाधव बोलत होते.   यावेळी माणगाव तहसिलदार श्रीमती प्रियांका कांबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंखे, गटविकास अधिकारी श्री.गाढवे, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.जाधव म्हणाले, निवडणूक आयोगाद्वारे मतदार जागृती कार्यक्रम राबवित आहे.  महाविद्यालयातील तरुणांनी मतदान जागृती कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. प्रत्येक गावांत 100% मतदान होण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे. येथील दान उत्सवातही मतदान जागृती कार्यक्रमाचा समावेश आहे. तरुणांनी यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.  
  दान उत्सव (अगोदरचे जॉय ऑफ गिविंग) हा 2019 साली सुरु झालेला एक स्वयंसेवी गट आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 8 ऑक्टोंबर  हा आठवडा दान उत्सव म्हणून साजरा केला जातो. या आठवडयात सामील झालेली स्वयंसेवी गट पैशाव्यतिरिक्त आपला वेळ, संसाधने किंवा कौशल्ये समाजोपयोगी कामात दान  करतात.
दान उत्सवात स्वच्छता 100%  निर्मल गावांच्या दिशेने, ग्रामोदयोग व महिला सक्षमीकरण,शिक्षण – शेक्षणिक गुणवत्ता, मतदान जनजागृती हे उपक्रम राबवितात.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक