श्रीवर्धन विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांचा दौरा
रायगड-अलिबाग दि.01:- 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक
खर्च निरीक्षक श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी
9158724634 (ई-मेल-expobsalibag@gmail.com)असा आहे.
193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या
उमेदवारांचे खर्च तपासणी व ताळमेळ संदर्भात मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे सकाळी 10.00 वा पुढीलप्रमाणे बैठका घेणार आहेत. बुधवार दि.09 ऑक्टोंबरला पहिली बैठक. शनिवार दि.
12 ऑक्टोंबरला दुसरी बैठक आणि बुधवार दि.16
ऑक्टोंबरला तिसरी बैठक घेणार आहेत.
०००००
Comments
Post a Comment