स्वीप अंतर्गत विद्यार्थ्यांकडून भरुन घेतले संकल्पपत्र



      रायगड-अलिबाग दि.05 : शाळा/महाविद्यालये व शासकीय/निमशासकीय, कार्पोरेट संस्था येथे मतदान करण्यासाठीचे सामुहिक शपथग्रहण, स्वाक्षरी अभियान,संकल्प पत्र भरुन घेणे, विविध प्रासंगिक उत्सवातून मतदानविषयक जनप्रबोधन, अन्य सांस्कृतिक व नावीन्यपूर्ण उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.
 या कार्यक्रमांतर्गत आयटीआय पेण येथील मतदार यादीतील 110 विद्यार्थीचे  मी मतदान करणार असे संकल्प पत्र भरुन घेतले.  यावेळी  स्वीप नोडल अधिकारी  सुनिल जाधव व संस्थेतील प्राध्यापक उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानातून आई-वडील, नातेवाईक यांना 21 तारखेला होणाऱ्या मतदानाला मतदान करण्यासाठी आवाहन करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक