शेतीसंबंधी वाहने, मान्सूनपूर्व कामे व वैद्यकीय कामांसाठी वापरली जाणारी वाहने व त्यासंबंधीच्या उपकरण दुरुस्ती कामांची सेवा/ दुकाने/प्लांट सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी मात्र सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेतच

 


 

अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) : राज्यात वाढत्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

       शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणारी तसेच खाजगी प्रकारची मान्सूनपूर्व कामे करण्याची व शेतीसाठी आवश्यक असणारे ट्रॅक्टर, टिल्लर व इतर शेती विषयक उपकरणे तसेच कोविड विषाणूचा प्रादूर्भावाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वाहनांची तसेच ऑक्सिजन वाहन करणारी वाहने व अनुषंगिक उपकरणांची दुरुस्तीची आवश्यकता भासत आहे.   

       याशिवाय सद्य:स्थितीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदी  आदेशामुळे आपत्कालीन परिस्थितीत शेतीसंबंधी वाहने, मान्सूनपूर्व कामे व वैद्यकीय कामांसाठी वापरली जाणारी वाहने तसेच उपकरणांच्या दुरुस्तीची कामे विचारात घेता काही सेवा/ दुकाने/प्लांट सुरु ठेवणे आवश्यक आहे.

      या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामे, शेतीसाठी आवश्यक असणारे व वैद्यकीय सुविधेच्या अनुषंगाने इमारतीचे संरक्षण करण्याविषयीची कामे करण्यास उदा. शटरींग, वॉटर प्रूफिंग, फ्लड प्रोटेक्शन, प्रॉपींग, स्ट्रक्चरल रिपेयर्स तसेच धोकादायक इमारती पाडण्याची कामे व  इतर अनुषंगिक कामे, या कामांना सुविधा पुरविणारे कामगार, सिमेंट लोखंड, हार्डवेअर इ. घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांची दुकाने, RMC Plant, डांबर व खडी निर्मिती करणारे प्लांट, शेतीविषयक कामांसाठी ट्रॅक्टर, टिल्लर व इतर शेतीविषयक उपकरणे दुरुस्त करणारे वर्कशॉप/गरज व स्पेअर पार्टची दुकाने,  ऑक्सिजन वाहन करणारी व वैद्यकीय सुविधा देणाऱ्या वाहनांना दुरुस्त करणारे वर्कशॉप/गॅरेज व स्पेअर पार्टची (सेवा/दुकाने/प्लांट) दुकाने सुरु ठेवण्यासाठी कोविड विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीनतेने सुरु ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परवानगी दिली आहे.

      तसेच कोविड विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारी सिमेंट, लोखंड, हार्डवेअर स्पेअर पार्ट इ. घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांची दुकाने अत्यावश्यक सेवा म्हणून सकाळी 7.00 वा . पासून ते सकाळी 11.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्यात येतील.

 कोविड विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता, 1960 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक