जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवांरासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

 

वृत्त क्रमांक:- 318                                                              दिनांक:- 28 एप्रिल 2021


 

अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

 या वेबिनारमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या योजनांसंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती उज्वला  पाटील या मार्गदर्शन करणार आहेत.

या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी CISCO WEBEX  हे ॲप गुगल प्ले-स्टोअर वरुन डाऊनलोड करावे. नंतर Join from the meeting link https://mhdit.webex.com/mhdit/j.php? MTID=m 9896f 1c 3b db 281 c 9 f 3a 893175e525483  Meeting  ID : 184 609 1294, Meeting password:  123456  या लिंकचा वापर करुन दि. 30 एप्रिल 2021 रोजी दुपारी  12.00  पूर्वी 10 मिनिटे अगोदर कनेक्ट व्हावे. सहभागी व्यक्तींनी कनेक्ट होताना आपले माईक व व्हिडिओ म्यूट/बंद ठेवावेत. आपणास प्रश्न विचारावयाचा असेल त्याच वेळी आपला माईक अनम्यूट करुन प्रश्न विचारावेत.

तरी जिल्हयातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी या सूवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शा.गि.पवार यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक