लॉकडाऊन कालावधीमध्ये गरजू व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मदत कक्षाची स्थापना

 

वृत्त क्रमांक:- 320                                                            दिनांक:- 29 एप्रिल 2021


अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या पत्रानुसार लॉकडाउन कालावधीत गरजू व्यक्तींना कायदेशीर सल्ला व सहाय्य मिळण्यासाठी मदत कक्ष निर्माण करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या वतीने जिल्ह्यातील तीन सत्र विभागांमध्ये (Sessions Division) गरजू, पीडित व्यक्तींना भ्रमणध्वनी /व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी किंवा कायदेशीर सल्ला व सहाय्य देण्यासाठी महिला व पुरुष वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे.

अलिबाग सत्र विभागाकरिता :- ॲड.जयंत चेऊलकर, मो.9822502011, ॲड. श्रीमती शिल्पा नागेश पाटील मो. 94233775015/8698775015, ॲड. श्रीमती तनुष्का तुषार पेडणेकर मो. 7057881666/7083818666.

 पनवेल सत्र विभागाकरिता :- ॲड.मनोहर पाटील, मो.9869056906, ॲड. विशाल ए. मुंडकर मो.9221777604.

 माणगाव सत्र विभागाकरिता :- ॲड. श्रीमती एस. एस. मराठे, मो.9423806849, ॲड.व्ही.यू.घायाळ    मो.9923217733.

 जिल्ह्यातील गरजू व पीडित व्यक्तींनी कायदेशीर बाबींविषयक सल्ला किंवा सहाय्य हवा असल्यास वरील वकिलांशी संपर्क साधावा.  तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ईमेलवर अथवा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या

(नालसा)

 पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक