महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत आज (दि.3 जून) रोजी अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे HB, BP,ऑक्सिजन, व अँटीजन टेस्ट अशा विविध प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

    या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 37 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

      यावेळी  गटाविकास अधिकारी सौ.दिप्ती पाटील, सहायक गटविकास अधिकारी श्री.चौलकर, श्री. मंगेश पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी, वाडगाव ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेविका, आरोग्य केंद्रातील डॉक्टर,स्टाफ सीआरपी ताई आणि प्रभाग समन्वयक अमोल माळी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक