जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मी. पावसाची झाली नोंद
वृत्त क्र.482
दि.02 जून, 2021
अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका)- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.80 मि.मी
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 472.80 मि.मी.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग- 0.00 मि.मी., पेण-
0.00 मि.मी., मुरुड- 28.00 मि.मी., पनवेल- 4.06 मि.मी., उरण- 0.00 मि.मी., कर्जत-
0.0 मि.मी., खालापूर- 0.0 मि.मी., माणगाव- 8.0 मि.मी., रोहा- 21.0 मि.मी., सुधागड-
0.0 मि.मी., तळा- 61.0 मि.मी., महाड- 10.0 मि.मी., पोलादपूर- 54.00 मि.मी, म्हसळा-
39.00 मि.मी., श्रीवर्धन- 10.0 मि.मी., माथेरान- 81.2 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान
316.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 19.80 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 0.94 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment