म्हसळा तालुक्यातील मौजे सावर येथे होणार औषधी वनस्पती तसेच दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड

 

अलिबाग, दि.02 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील मौजे सावर येथील स.नं.24/2, क्षेत्र 3.12.00 हे.आर व स.नं. 26/8 क्षेत्र 1.34.00 हे.आर या जमिनीमध्ये तहसिलदार कार्यालय म्हसळा, वसंतराव नाईक महाविद्यालय म्हसळा व विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ व औषधी वनस्पती यांची लागवड करण्यात येणार आहे.

या ठिकाणी विविध औषधी वनस्पती तसेच दुर्मिळ होत चाललेल्या विविध प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. हे उद्यान सर्व अभ्यासू विद्यार्थी व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे, असे म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक