स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “घरोघरी तिरंगा” अभियानाच्या निमित्ताने “मिनी मॅरेथॉन” स्पर्धा संपन्न

जवळपास तीनशे युवक-युवती व विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी


 

              अलिबाग, दि.04 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत घरोघरी तिरंगा” अभियानाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा परिषद, रायगड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, नेहरु युवा केंद्र,रायगड, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग व रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी 07.00 वा. या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे युवक-युवती व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.  या स्पर्धेची समाप्ती शहीद निलेश तुणतुणे यांचे सहाणगोठी येथील स्मारक  येथे करण्यात आली. समारोप कार्यक्रमावेळी शहीद निलेश तुणतुणे यांचे वडील नारायण तुणतुणे, आई सौ.निर्मला तुणतुणे, भाऊ शैलेश तुणतणे, सौ. ती तुणतुणे व इतर कुटुंबियांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तिरंगा झेंडा देवून सन्मान करण्यात आला.

 





या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- मुलांचा गट प्रथम -  संदिप पाल, व्दितीय–राजेश तांबोळी, तृतीय– रामु पारधी , चौथा- धिरज पाटील, पाचवा- सौरभ गोटुरे  तर मुलींच्या गटामध्ये प्रथम -कथा वाडकर,   व्दितीय – अमृता शेडगे, तृतीय –भुमी म्हात्रे, चौथी-सेजल घरत, पाचवी- कुंजल नाईक या खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये प्रियांशी भोईर या आठ वर्षाच्या खेळाडूने सहभाग घेवून स्पर्धा पूर्ण केली तिचा आणि या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा शहीद निलेश तुणतुणे यांचे कुटुंबियांच्या हस्ते बक्षिस, प्रमाणपत्र व तिरंगा ध्वज देवून सन्मात करण्यात आला. या स्पर्धेसाठी पोलिस विभागाच्या वाहतुक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियमन करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा न येता स्पर्धा सुरळीत पार पडल्या.  स्पर्धेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रुग्णवाहीका व वैद्यकीय प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. स्पर्धेच्या तांत्रिक बाबींसाठी रायगड जिल्हा ॲथलेटीक असोसिएशनचे पंच व पायलट यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. पंचांमध्ये  यतिराज पाटील, अभिषेक पाटील, शिवम ठोंबरे, अमर तुणतुणे, अक्षय राणे, आशुतोष शिर्के, मंदार सीणकर, समीर माळी, तेजेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे यांनी काम पाहीले. या स्पर्धेच्या आयेाजनासाठी संदिप वांजळे, सचिन निकम, सुचिता साळवी,  सुरेंद्र कांबळे, प्रफुल पाटील, विनय राऊत इत्यादींनी काम पाहीले. 

यास्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक यांनी केले. प्रास्ताविकामध्ये श्री.नाईक यांनी आवाहन केले की विद्यार्थी व  तरुणांनी घरोघरी तिरंगा या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. अशा उपक्रमांमधून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी युवक-युवती तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागते. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्पर्धेबाबतही मार्गदर्शन केले.

यावेळी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौतेला, केंद्रीय माहिती व प्रसार संचालनालयाचे श्री.फनीकुमार, तालुका क्रीडा अधिकारी श्रीम.अंकिता मयेकर, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या श्रीम.तपस्वी गोंधळी, निवृत्त कॅप्टन श्री.उमेश वाणी,  पत्रकार श्री प्रफुल पवार, श्री कांबळे, श्री मेश्राम सर इत्यादी उपस्थित होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक