गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात गुरुवारअखेर 2 लाख 66 हजार बालकांना लसीकरण
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.7- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून मिझेल
रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार
451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान या अभियानांतर्गत गुरुवार (दि.6
डिसेंबर) अखेर जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार
583 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात
आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त
अहवालानुसार काल दि.6 रोजी दिवसअखेर
जिल्ह्यातील 318 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 57 शाळांमध्ये जिल्हा
शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 8 हजार 52 विद्यार्थ्यांना तर 261
शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 18 हजार 531
विद्यार्थ्यांना अशा एकूण 26 हजार 583 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात
14 हजार 361 मुले व 12 हजार 222 मुलींचा समावेश आहे. तर आज अखेर एकूण 1 लाख 40 हजार 333 मुले व 1 लाख 26 हजार 250 मुली असे एकूण 2 लाख 66 हजार 583
विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment