दादली व टोळ पुलावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7- सावित्री खाडीवरील दादली पूल व टोळ पूल कमकुवत झाल्याने त्यावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार या पुलावरून केवळ 20 मे. टन वाहतूक प्रति तास 20 कि.मी या वेगानेच करता येणार आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले असून शासन राजपत्रही प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, सावित्री खाडीवरील मांदाड तळा, इंदापूर, निजामपूर, पाचाड-महाड विसापूर रस्त्यामधील दादली पूल (लांबी 120.50 मीटर) तसेच वीर टोळ, आंबेत, बागमांडला रस्ता हा टोळ पूल (लांबी 158 मीटर) हे कमकुवत झाले आहेत असा अहवाल अधिक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवीमुंबई यांनी त्यांच्या कार्यालयीन पथक व क्षेत्रीय अधिकारी यांनी पाहणी अंती दिला आहे.
 त्यानुसार या पुलांवरील अवजड वाहतूक बंद करुन फक्त 20 मे.टन पर्यंत वजनाची वाहतूक प्रति तास 20 मि.मी.इतक्या धिम्या गतीने वेगाने चालू ठेवण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांना सूचित केले  आहे.  याबाबत योग्य ती कार्यवाही करावे असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी रायगड यांनी, मांदाड तळा इंदापूर निजामपूर पाचाड महाड विसापूर रस्ता दादली पूल व वीर टोळ, आंबेत, बागमांडला रस्ता हा टोळ पूल हे दोन्ही पूलावरूल अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन फक्त 20 मे.टन पर्यंत वजनाची वाहतूक प्रति तास 20 कि.मी.इतक्या धिम्या वेगाने चालू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक