विशेष लेखःदिव्यांगांच्या मतदान अधिकार अंमलबजावणीसाठी ‘सुलभ निवडणूका’

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहीर केले असून त्यानुसार अपंग घटकांतील मतदारांना निवडणूक प्रक्रिया सुलभ करावी यासाठी मतदान विषयक जनजागृती केली जात आहे. त्यानिमित्ताने दिव्यांग मतदारांनी आपल्या मतदान हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी काय करावे? या संदर्भात माहिती देणारा हा लेखः-
दिव्यांग मतदारांना आपल्या अपंगत्वामुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याविषयी निवडणूक आयोगामार्फत मोठ्याप्रमाणावर जनजागृती केली जात आहे.
 दिव्यांगांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यापासून ते त्यांनी आपल्या नजिकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करे पर्यंत विविध सुलभता निवडणूक आयोग उपलब्ध करुन देत आहे.
यासंदर्भात दिव्यांगांना हे करता येईल-
मतदार यादीत नावनोंदणी-
  • मतदार यादीत नोंद व्हावी याकरिता प्रथम फॉर्म क्र.6 भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.   हा फॉर्म भरुन त्यासोबत फोटो, ओळखपत्र, निवासस्थानाचा पुरावा अशी कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
  • तुम्हाला योग्य सुविधा मिळावी म्हणून तुम्ही तुमच्या अपंगत्वाचा तपशील बाब (च) मध्ये देऊ शकता जेणेकरुन हा तपशील संबंधित मतदान केंद्रावर आवश्यक ती सुविधा पुरवण्यासाठी कळविता येईल.
  • जुन तुम्ही तुमचं गाव या आधीच नोंदवल असेल आणि तुम्हाला तुमच्या अपंगत्वाविषयी तपशील द्यायचा असेल तर तुमच्या  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. 
फॉर्म इंटरनेटवरही उपलब्ध-
  • आंतरजालाची  उपलब्धतता, कार्यपध्दती आणि त्याविषयीच्या तांत्रिकबाबी माहित असल्यास संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म भरु शकता. National Voters Services Portal (NSVP) म्हणजे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in/Forms/Form6  इथे जा.  यावर इंग्रजीमध्ये तसेच भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे.  इथे ऑनलाईन फॉर्म भरुन नावनोंदणी करता येईल.
  • तुम्ही  https://eci.nic.in/eci_main/forms/Form6.pdf वर जाऊ शकता यावरुन फॉर्म 6 ची छापील प्रत घेऊन पेनाने भरता येईल.  त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि छापील प्रत मतदार मदत केंद्रावर (VHC) जाऊन सादर करा.
मतदार मदत केंद्र सुविधा-
  • https://ceo.maharashtra.gov.in/lists/VHCs.aspx ला भेट द्या.  तुमचा जिल्हा निवडा.  म्हणजे तुम्हाला मतदार मदत केंद्राची यादी मिळेल.  त्यामध्ये केंद्राचा पूर्ण पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकही असेल.  त्यावरुन केंद्र निवडा आणि तिथे जाऊन फॉर्म 6 सादर  करा.
इंटरनेट वापरता येत नसल्यास-
  •  जवळच्या मतदार मदत केंद्रावर फॉर्म 6 उपलब्ध आहे. तिथूनच फॉर्म 6 घेऊन आणि तो भरुन तिथेच सादर करता येईल.
अधिक माहितीचे स्त्रोत-
  • https://eci.nic.in   मतदान प्रक्रियेशी संबंधित कायदे, नियम आणि भारतीय निवडणूक आयोगाने विहित केलेली मार्गदर्शक तत्त्वे याविषयीच्या माहितीसाठी.
  • https://ceo.maharashtra.gov.in महाराष्ट्र राज्याशी संबंधित निवडणूक विषयक माहितीसाठी (मतदार मदत केंद्रे, मतदार यादीत तुमचे नाव शोधणे इ.)
  • मतदान केंद्राच्या यादीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/Lists/ListPSs.aspx
  • https://www.nvsp.in  ऑनलाईन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणे इत्यादीसाठी.
  • https://eci-citizenservices.eci.nic.in तक्रारीसाठी
मतदान करत असताना उपलब्ध मदत-
  •  अपंगांना तसेच त्यांच्या सोबतचे जोडीदार आणि नातेवाईक यांना जाणे-येणे सुलभ व्हावे यासाठी केंद्रावर योग्य ती व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • तुम्हाला आवश्यक ते सहकार्य देण्याविषयी  निवडणूक अधिकाऱ्यांनाही सचेतन करण्यात आले आहे.
  • स्वतंत्र रांग आणि प्राधान्याने मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.  
  • मतदानदिनी संभाव्य अडथळे दूर करण्याविषयी कर्मचारी, स्वयंसेवक आणि समाजाकडून सकारात्मक तसेच कृतिशील प्रतिसाद मिळेल.
  • व्हीलचेअर्स, स्वयंसेवक, सांकेतिक पाट्या, मदत केंद्र, सहज वाचता येण्याजोगी पत्रके, ब्रेल मतपत्रिका, उमेदवारांची यादी यासह ब्रेल इव्हीएम्स इत्यादी मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
  • अंध व्यक्ती आपले मत देण्यासाठी फॉर्म 49 ए भरुन आपल्या साथीदाराची मदत घेऊ शकतात.
  • अपंग व्यक्तींसाठी पार्किंगची विशेष सोय असेल, जे अपंग मतदार सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतील त्यांना मतदान केंद्रापर्यंत विनामूल्य प्रवास करता येईल.
- संकलनः जिमाका रायगड,अलिबाग, जि. रायगड

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक