जिल्हा रुग्णालयात संपन्न झाले फायर सेफ्टी प्रशिक्षण

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.01 (जिमाका) :- येथील जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांच्या तसेच रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित कलेल्या सूचनांनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या सहकार्याने तसेच अग्निशामक प्राधिकरणाच्या मदतीने (दि.1 फेब्रुवारी) रोजी फायर सेफ्टीच्या अनुषंगाने अधिकारी- कर्मचाऱ्यांचे फायर सेफ्टी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या प्रशिक्षणाच्या वेळी अग्निशामक प्राधिकरण तज्ज्ञांनी आगीचे प्रकार सांगून प्रत्यक्षात आग लागली असता ती आग कशा पध्दतीने विझवावी, याची शास्त्रशुध्द प्रात्यक्षिके त्यांच्या टीममार्फत करुन दाखविली.

भंडारा जिल्ह्यासारखे प्रकरण या रुग्णालयात घडू नये, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितले.

रुग्ण व रुग्णालयाच्या दृष्टीने फायर सेफ्टीबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले व अप्रत्यक्षरित्या आग लागल्यानंतर कसा बचाव करावा, याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आले. रुग्णालयाबरोबरच रुग्ण व त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांचीही सुरक्षा कशी करावी, याचेही प्रात्यक्षिक अग्निशामक दलातील तज्ञांच्या देखरेखीखाली करुन  घेण्यात आले.

 या प्रशिक्षण व प्रात्यक्षिकात  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, प्रशासकीय अधिकारी पी.डी.धामोडा, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, अधिसेविका श्रीमती जयश्री मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुरेश शिंपी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम) डॉ. चेतना पाटील तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक