औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा येथे दि.07 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग, जि.रायगड,दि.04 (जिमाका):- सत्र 2020-21 मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागी प्रवेश मिळण्यासाठी दि.3 फेब्रुवारी 2021 पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी admission.dvet.gov.in लिंक पुन्हा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण प्रवेशोत्सुक उमेदवारांनी दि.07 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करुन फी भरुन अर्ज निश्चित करावा. प्रवेश प्रक्रिया दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा येथे भेट द्यावी. प्रवेश संकेतस्थळावर प्रवेशाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा पी.एम.बिरार यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक