रोहा जिल्हा परिषद गट क्र.41 वरसे व तळा तालुक्यातील पंचायत समिती 86 काकडशेत या निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकांसाठी मतदारयादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जाहीर

 


अलिबाग, जि.रायगड,दि.05 (जिमाका):-   मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.41 वरसे व तळा तालुक्यातील पंचायत समिती 86 काकडशेत या निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकांसाठी मतदारयादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे-

मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 15 जानेवारी 2021, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार केलेली मतदारयादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्दी करण्याचा दिनांक 18 फेब्रुवारी 2021, मतदारयादी संदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2021, निवडणूक विभाग/निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याचा दिनांक 05 मार्च 2021, निवडणूक विभाग/निर्वाचक गणाच्या छापील मतदारयाद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 05 मार्च 2021, मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिध्दी करणे दिनांक 10 मार्च 2021.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक