गोवर रुबेला लसीकरण मोहि : जिल्ह्यात आजअखेर 1 लाख 60 हजार बालकांना लसीकरण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून मिझेल रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान शनिवार (दि.1 डिसेंबर)  अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 3  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल दि.1 रोजी दिवसअखेर  जिल्ह्यातील 241 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 56 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 7 हजार 703 विद्यार्थ्यांना तर 185 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 16 हजार 38  विद्यार्थ्यांना अशा एकूण 23 हजार 741 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 12 हजार 235 मुले व 11 हजार 506 मुलींचा समावेश आहे.  तर आज अखेर एकूण 83 हजार 688 मुले  व 76 हजार 315 मुली  असे एकूण 1 लाख 60 हजार 3 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी         डॉ.सचिन सावंत यांनी दिली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक