बारावीच्या विद्यार्थ्यांची जातवैधता पडताळणी; 31 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित होण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जात वैधता  प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करणे,अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करणे इ.प्रक्रिया करण्यासाठी समितीस पुरेसा अवघी मिळणेसाठी महाविद्यालयांनी प्रत्येक वर्षी दि.31 डिसेंबर या तारखेपर्यंत समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त् तथा सदस्य्, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विशाल नाईक, यांनी केले आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा अर्ज विहीत दिनांकापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह या समितीस प्राप्त होईल याबाबत सुचना द्यावी व अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अनुसूचित जाती(SC) विमुक्त् जाती भटक्या जमाती,(VJNT) विशेष मागास प्रवर्ग(SBC) व इतर मागासवर्ग (OBC) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरअर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर 2018 पूर्वी कनिष्ठ महाविद्यालयामार्फत या समितीकडे दाखल करावेत. तरी इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्यासाठी आपले अर्ज जिल्हा जात पडताळणी समिती, रायगड 2 रा मजला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,प्रशासकीय इमारत,गोंधळपाडा, अलिबाग येथे त्वरीत संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक