सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापनांमधील रिक्त पदे अधिसूचित करण्याकरिता तिमाही विवरणपत्र इआर-1 भरावेत



अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- सेवायोजन कार्यालये कायदा 1959 आणि नियमावली 1960 च्या कायद्यातील भाग-5 मधील उपभाग (1) अन्वये जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची दर तिमाही  (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नमूना फॉर्म ईआर-1 मध्ये ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. ही माहिती शासन स्तरावरुन केंद्र शासनाकडे ऑनलाईन पध्दतीने संकलीत केली जाते.
ईआर-1 भरण्यासाठी सेवायोजन विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर Employment या टॅबमध्ये जाऊन Employer (List a Job) ला क्लीक करुन आपला युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉगइन झाल्यानंतर  वेबपोर्टलवर Emploement Returns-1(ER-1) या प्रपत्रात ईआर-1 बाबतची माहिती भरुन शकता. वेबपोर्टलवर ईआर-1 प्रपत्रामध्ये माहिती भरताना काही समस्या निर्माण झाल्यास या कार्यालयाच्या उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा alibagrojgar@gmail.com या ईमेल त्वरीत कळवावे.
       विवरणपत्रातील माहिती पाठविणे या कायद्यान्वये बंधनकारक आहे. या कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन करणारी आस्थापना कायद्यातील भाग-7 पोटकलम (2) अन्वये पुढील कारवाईस पात्र ठरते. तरी ईआर-1 विवरणपत्र पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता रायगड अलिबाग शा.गि.पवार यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक