जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32.44 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका)
:- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.44 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर
एकूण सरासरी 1344.58 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली
आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
याप्रमाणे-
अलिबाग 38.00 मि.मि., पेण-35.00
मि.मि., मुरुड-26.00 मि.मि., पनवेल-23.80 मि.मि., उरण-27.00 मि.मि., कर्जत-29.20
मि.मि., खालापूर-19.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-54.10 मि.मि., सुधागड-36.00
मि.मि., तळा-52.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-33.00मि.मि.,
श्रीवर्धन-46.00 मि.मि., माथेरान-49.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 519.10
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 32.44 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 41.80 टक्के इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment