जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 36.58 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका)
:- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली
आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1312.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली
आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 71.00 मि.मि., पेण-70.00 मि.मि.,
मुरुड-45.00 मि.मि., पनवेल-22.00 मि.मि., उरण-46.00 मि.मि., कर्जत-7.60 मि.मि., खालापूर-45.00
मि.मि., माणगांव-22.00 मि.मि., रोहा-38.30 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-30.00
मि.मि., महाड-33.00 मि.मि., पोलादपूर-24.00, म्हसळा-28.00मि.मि., श्रीवर्धन-42.00 मि.मि.,
माथेरान-41.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 585.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी
36.58 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 40.80 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment