कोणतीही कायदेशीर त्रुटी न राहता आरोपीस जबर शिक्षा मिळावी यासाठी खबरदारी घेण्याचे पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश




अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- पनवेल येथील इंडिया बुल्स मधील कोविड-19 विलगीकरण कक्षात काल (दि.17 जुलै रोजी) एका महिलेवर अतिप्रसंगाची दुर्दैवी घटना घडली होती.
                 या घटनेतील संबंधित आरोपीची कसून चौकशी करावी, तपास प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी तपास अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि संबंधित आरोपीस जबर शिक्षा मिळावी, यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पोलीस विभागाला आणि प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
                 या घटनेतील आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर गु.र.नं.101/2020, भादंवि कलम 376 व 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                मात्र हा आरोपी संशयित करोनाबाधित असल्याने त्यास कोविड सेंटर मध्येच पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्या आरोपीचा  कोविड चाचणी अहवाल प्रतिक्षेत असून तो प्राप्त झाल्याबरोबर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक