लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व इतर कामकाजास दि.15 ते 26 जुलै पर्यंत स्थगिती




अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि. 15 जुलै रात्री 12 वाजल्यापासून  ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला आहे.
त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दि.15 ते 26 जुलै 2020 या कालावधीपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाजास स्थगिती देण्यात आली आहे. 
या कालावधीत विविध कामांसाठी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांची कामे टाळेबंदी काळानंतर समायोजित केली जातील. टाळेबंदीच्या कालावधीत नागरिकांना पूर्वनियोजित वेळा मिळालेल्या असल्यास किंवा काही कागदपत्रे सादर करावयाची असल्यास संबधित नागरिकांची कामे टाळेबंदी संपल्यानंतर केली जातील याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक