जिल्हयातील उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी वार्षिक परतावा दि.30 जून पर्यंत ऑनलाईन सादर करावा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांचे आवाहन

 

 

अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :-  रायगड जिल्हयातील उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी वार्षिक परतावा Food Safety Compliance System (FoSCoS) https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

दि. 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला आहे व त्याची अंमलबजावणी रायगड जिल्हयात अन्न व औषध प्रशासन, रायगड या कार्यालयातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा व मानदे (परवाना व नोंदणी) नियमन 2011 मधील परवाना अट क्र.5 व नियमन 2.1.13 (1) नुसार सर्व अन्न पदार्थ उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी वार्षिक परतावा (Annual Return) नमुना डी-1 मध्ये परवाना अधिकारी यांच्याकडे दरवर्षी 31 मे पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये वार्षिक परतावा Food Safety Compliance System (FoSCoS) https://foscos.fssai.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे सन 2020-2021 पासून बंधनकारक केले असून कोविड 19 च्या प्रादूर्भावामुळे सन 2020-2021 चा वार्षिक परतावा सादर करण्यासाठी दि. 30 जून, 2021 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

तरी रायगड जिल्हयातील सर्व उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने सन 2020-2021 चा वार्षिक परतावा Food Safety Compliance System (FoSCoS)  https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दि.30 जून 2021 पूर्वी न चुकता सादर करावा. त्यानंतर दर दिवशी रू. 100/- प्रमाणे दंड भरूनच वार्षिक परतावा ऑनलाईन सादर करता येईल, याची नोंद घ्यावी.

 

त्याचप्रमाणे जिल्हयातील ज्या उत्पादक/आयातदार पेढयांनी सन 2020-2021 चा वार्षिक परतावा प्रत्यक्ष कार्यालयात अथवा कार्यालयाच्या ईमेल वर सादर केलेला आहे, त्यांचा वार्षिक परतावा ग्राहय धरला जाणार नाही. त्यांनी सन 2020-2021 चा आपला वार्षिक परतावा पुन्हा Food Safety Compliance System (FoSCoS)  https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दि.30 जून 2021 पूर्वी न चुकता सादर करावा, अन्यथा दि. 30जून 2021 नंतर दर दिवशी रू.100/- प्रमाणे दंडास पात्र राहतील, याची त्यांनी नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक